आपली शाळा ...मराठी शाळा

एक पाऊल पुढे

मराठीशाळा परिपूर्ण परिपाठ  आज .....
Today ...
Monday, 23 April 2018 02:45 pm  

सुविचार ...
Good Thought ...
ज्ञानसागर ...
महाराष्ट्र देशा.....
महाराष्ट्र माझा
संगणक मित्र.....
श्लोक ...
 यु॒ञ्जन्त्य॑स्य॒ काम्या॒ हरी॒ विप॑क्षसा॒ रथे॑ । शोणा॑ धृ॒ष्णू नृ॒वाह॑सा ॥ २ ॥

युञ्जन्ति अस्य काम्या हरी इति विऽपक्षसा रथे । शोणा धृष्णू इति नृऽवाहसा ॥ २ ॥

ते परिचारक त्याच्या रथाच्या दोहो बाजूंस अश्व जोडीत आहेत. हे अश्व इतके सुंदर आहेत कीं कोणाच्याही मनामध्यें त्यांचे विषयीं अभिलाषा उत्पन्न होईल. त्यांचा वर्ण किंचित् तांबूस असून ह्या पराक्रमी देवास वाहून नेत असतांना त्यांच्या अंगांतील तेजस्वीपणा दृगोचर होतो. ॥ २ ॥
बोधकथा ...


राम आणि भरत

रावणाचा वध करून राम अयोध्‍येला परत आले आणि त्‍यांचा राज्‍याभिषेक झाला तेव्‍हा एक दिवस एका सभासदाने भरताला विचारले की आपण रामासाठी इतका मोठा त्‍याग केला आणि रामही आपल्‍याला प्राणप्रिय समजतात मग असे काय कारण आहे की आपल्‍याला सर्वात मागे स्‍थान देण्‍यात आले आहे? भरत म्‍हणाले,'' जे झाड कडू असेल त्‍याची सर्व पाने, फळे व फुले कडू असतात, माझ्या मातेने रामाला वनवासाला पाठवून पाप केले होते. तिचा पुत्र असल्‍यामुळे त्‍या पापाच्‍या कडवटपणातून मी कसा अलिप्त राहू शकतो? त्‍यामुळे मला मागचे स्‍थन देण्‍यात आले आहे.'' जेव्‍हा सभासदाने रामाला भरताचे हे विचार सांगितले तेव्‍हा रामचंद्र म्‍हणाले,''भरताचे हे विचार ठीक नाहीत, अयोध्‍येला परतल्‍यावर मी भरताला म्‍हटले होते की, उद्यापासून तू माझे छत्र घेऊन माझ्या मागे उभा राहा. कोणीही राजा तोपर्यत राजा राहू शकतो जोपर्यत त्‍याचे छत्र सुरक्षित आहे.'' सभासद आता विचारात पडला की कोणाचे विचार खरे मानावे? त्‍याने परत जाऊन भरताला रामाचे विचार ऐकवले. भरत म्‍हणाले,''रामचंद्र तर आपल्‍या लहानातल्‍या लहान सेवकाचीही प्रशंसा करत असतात. खरे तेच आहे जे मी तुम्‍हाला सांगितले.'' सभासद गोंधळला त्‍याने रामाला पुन्‍हा जाऊन भरताचे विचार सांगितले तेव्‍हा रामचंद्र म्‍हणाले,'' प्रेम आणि त्‍यागाच्‍या युद्धात मी भरताकडून हरलो, मी आपला पराभव स्‍वीकारून त्‍याला पाठ दाखविली, त्‍यामुळे तो पाठीमागे आहे. त्‍याचे मागे होणे हे त्‍याच्‍या महानतेचे लक्षण आहे.

तात्पर्य

त्‍याग, सेवा आणि भक्ती हे तीन सूत्रे धरतीवर रामराज्‍य साकार करू शकतात. धन्‍य ते प्रभू रामचंद्र आणि त्‍यांचे बंधू
दिनविशेष ...
 दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहीतीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा 

दिनविशेष : २३ एप्रिल : जागतिक पुस्तक दिन

हा या वर्षातील ११३ वा (लीप वर्षातील ११४ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९० : नामिबिया संयुक्त राष्ट्रांत प्रवेश होऊन तो १६० वा सदस्य देश बनला.
१८१८ : दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले. [चैत्र व. ३]

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३८ : एस. जानकी – शास्त्रीय गायिका
१८९७ : लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: २७ डिसेंबर १९७२)
१८७३ : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (मृत्यू: २ जानेवारी १९४४)
१८५८ : पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)
१८५८ : मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (मृत्यू: ४ आक्टोबर १९४७)
१७९१ : जेम्स बुकॅनन – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १ जून १८६८)
१५६४ : विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: २३ एप्रिल १६१६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१३ : शमशाद बेगम – पार्श्वगायिका (जन्म: १४ एप्रिल १९१९)
२००७ : बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९३१)
२००१ : जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार इ. विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष  व केसरीचे संपादक (जन्म: १२ आक्टोबर १९२१)
२००० : मराठी चित्रपटांना आधार मिळावा या ध्येयाने प्रेरित होऊन गेली ४० वर्षे लालबागमधील ’भारतमाता’ चित्रपटगृह चालवणारे यशवंत सदाशिव ऊर्फ बाबासाहेब भोपटकर यांचे निधन (जन्म: ? ? ????)
१९९७ : डेनिस कॉम्पटन – इंग्लिश क्रिकेटपटू, ’गोल्डन बॉय’ (जन्म: २३ मे १९१८)
१९९२ : सत्यजित रे – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न. ’पथेर पांचाली’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला देशविदेशात अनेक गौरव मिळाले. त्यांना विशेष ऑस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. (जन्म: २ मे १९२१)
१९२६ : हेन्‍री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ (जन्म: २३ डिसेंबर १८५४)
१९८६ : जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)
१९५८ : शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक (जन्म: १० आक्टोबर १८७१)
१८५० : विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी. त्यांची ’डॅफोडिल्स’ ही अतिशय गाजलेली कविता आहे. (जन्म: ७ एप्रिल १७७०)
१६१६ : विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: २३ एप्रिल १५६४)
आज विशेष ...
भेटीगाठी -