आपली शाळा ...मराठी शाळा

एक पाऊल पुढे


----------------------

श्री.सुरेश गणपत भारती

M.A.B.Ed

प्राथमिक शिक्षक 

जि.प.प्राथमिक शाळा, येळूशीवाडी (पेमगिरी), ता.संगमनेर.  

"शिवालय", पुना रोड, संगमनेर खुर्द, 

संगमनेर जि. अहमदनगर ४२२६०५

9545 300 303

sureshbharati@marathishala.in

www.marathishala.in

www.yelushiwadi.in

परिचय

$ 1997 सालापासून संगणक क्षेत्रात कार्यरत.

$ विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना एकाच व्यासपीठावरून डिजिटल साहित्य मिळावे यासाठी www.marathishala.in ची निर्मिती

$ जिल्हा परिषद शाळेची www.yelushiwadi.in या नावाने अधिकृत वेबसाईट

$ जिल्हा परिषद अहमदनगर यांचा २०१५ सालासाठीचा ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ प्राप्त

$ श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड. सातारा (महाराष्ट्र) यांचे मार्फत सार्थ दासबोध ग्रंथाचा अभ्यास - तीन प्रमाणपत्र प्राप्त

$ जीवन प्रकाश, पवित्र शिक्षणशास्र, चाळीसगाव. जळगाव (महाराष्ट्र) यांचे अंतर्गत बायबल ग्रंथाचा अभ्यास – नऊ प्रमाणपत्र प्राप्त

$ दि.१८ एप्रिल २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) (SCERT), पुणे येथे आयोजित ‘राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक’ कार्यशाळेत राज्यासाठी तंत्रस्नेही आराखडा सादर.

$ महाराष्ट्रातील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी www.technoteachers.in नावाची वेबसाईट. या नोंदणी केलेल्याच शिक्षकांना तंत्रस्नेही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

$ दशनाम गोसावी समाज संगठन कामी योगदान – समाज संघटीत व्हावा यासाठी www.gosavisamaj.in नावाने गोसावी समाज online address book ची निर्मिती

$ लहान मुलांसाठी उपयुक्त अशा संस्कारक्षम गीतांचे संकलन असलेले ‘संस्कारमाला’ या पुस्तिकेचे दोन आवृत्त्या प्रकाशित.

तंत्रस्नेही चळवळ प्रचारप्रसार आणि कार्य प्रेरणेसाठी विविध कार्यशाळांचे आयोजनात सहभाग.

$ आधार फौन्डेशन, संगमनेर येथे आयोजित तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम.श्री.लक्ष्मण पोपट नरसाळे 

M.A.B.Ed

प्राथमिक शिक्षक 

जि.प.प्राथमिक शाळा, शिंदेमळा, ता.पारनेर.  

रुपमाता नगर, सावेडी 

ता. जि. अहमदनगर ४१४००३

7588 539 281

lpnarsale@marathishala.in

www.marathishala.in


परिचय

सन २००६ पासून संगणक क्षेत्रात कार्यरत

सन २००७-०८ पासून जि.प.प्राथ. शाळा, जांभूळवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथे स्वतःचा लॅपटॉप वापरून ई-लर्निंग ला सुरुवात. 

सन २०११-१२ पासून जि.प.प्राथ. शाळा, शिंदेमळा ( वडगाव सावताळ), ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे कार्यरत. लोकवर्गणीतून संगणक मिळवून ई-लर्निंग ला सुरुवात.

खडकाळ माळरानावर स्वच्छ व सुंदर शाळा निर्मिती, डिजिटल स्कूल निर्मिती.

विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना एकाच व्यासपीठावरून डिजिटल साहित्य मिळावे यासाठी www.marathishala.in ची निर्मितीत सहभाग.

$ 'वसुंधरा विचार मंच' स्वयंसेवी संस्थेची स्थापना त्या अंतर्गत करियर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन, डिजिटल स्कूल निर्मितीसाठी जि.प. शाळा गोरेगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर या शाळेस रु.४०,००० मदत.

दि.१८ एप्रिल २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) (SCERT), पुणे येथे आयोजित ‘राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक’ कार्यशाळेत राज्यासाठी तंत्रस्नेही आराखडा निर्मितीत सहभाग.

एप्रिल २०१५ : अहमदनगर जिल्यातील तंत्रस्नेही चळवळीची सुरुवात करताना Nagar Techno Teacher हा WhatsApp ग्रुप तयार.

स्वतःच्या शाळेत पाणीपुरवठा व साठवण यासाठी स्वतः रु.६२,०००/- खर्च करून सामाजिक कार्यात सहभाग.

तंत्रस्नेही चळवळ प्रचार, प्रसार आणि कार्य प्रेरणेसाठी विविध कार्यशाळांचे आयोजनात सहभाग.

अप्रगत विद्यार्थी मुक्त शाळा.

 

 

श्री.गोरक्ष सोपान पावडे 

M.A.B.Ed

प्राथमिक शिक्षक 

जि.प.प्राथमिक शाळा, डेरेशिवार, ता.पारनेर.  

दरोडी, ता.पारनेर  

जि. अहमदनगर ४१४३०५

7588 539 424

gorakhshapawade@marathishala.in

www.marathishala.in


परिचय

१९९९ सालापासून संगणक क्षेत्रात कार्यरत.

विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना एकाच व्यासपीठावरून डिजिटल साहित्य मिळावे यासाठी www.marathishala.in ची निर्मिती

सन २००२ मध्ये ग्रामस्थांकडे संगणकाची मागणी .

सन २००४ पासून विद्यार्थ्यांना संगणकाची आवड निर्माण करून संगणक शिक्षण

ओळख माहिती तंत्रज्ञानाची या उपक्रमातर्गत खेड्यातील ३९ शेतकऱ्यांच्या मुलांना महाराष्ट्र शासनाचा MS-CIT ( महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान प्रमाणपत्र परिक्षा ) परिक्षेस बसविले.

इयत्तावार MS-CIT परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थी ( इयत्ता पहिली ५ , इयत्ता २ री ४,इयत्ता ३ री ९ व इयत्ता ४ थी २१ विद्यार्थी )

२१ मे २००६ रोजी ETv  मराठी वर बातमी .

आकाशवाणी अहमदनगर येथे दोन वेळा कार्यक्रमाचे प्रसारण

महाराष्ट्रातील शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी विविध कार्यशाळांतून मार्गदर्शन

शाळा डिजिटल होण्यासाठी शिक्षक व  ग्रामस्थांना मार्गदर्शन.

शाळेमध्ये विद्यार्थी हिताचे विविध उपक्रमांची अंमलबजावणी जसे ह्स्ताक्षर सुधार प्रकल्प ,भाषा विकास ,वाचन संस्कृती विकास ,शिष्यवृत्ती ,प्रज्ञाशोध परीक्षा, ई लर्निंग ,स्वच्छ सुंदर शाळा, गांडूळ खत प्रकल्प  ,गणित विकास प्रकल्प , इ.

सामाजिक कार्य करण्यासाठी श्री.शिवशक्ती सेवाभावी संस्थेची स्थापना २०१५ .

भेटीगाठी -